भामेरच्या आजी-माजी सरपंचाचा सत्कार

0

भामेर । भामेर ग्रुप ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच मनोज काशीराम सोनवणे व नवीन प्रथम लोकनियुक्त सरपंच वैशाली मनोज सोनवणे यांचा जैताणे येथील सामाजिक कार्यकर्ती संघटना संत सावता युवक प्रतिष्ठाण तर्फे मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. भामेरचे सरपंच मनोज सोनवणे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. भामेर गाव व परिसर विकास त्यांनी घडवून आणला आहे. सर्वांत मोठी पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या त्यांनी सोडवली आहे.

दुग्धशर्करा योग म्हणजे पती सरपंच पदावरुन पायउतार होत असतांना पत्नी सरपंचपदी नियुक्त झाल्याची जिल्ह्यातील ही बहुदा पहिलीच घटना असावी म्हणून मावळत्या सरपंचांना निरोप व उदयोन्मुख सरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी जैताणे येथील संत सावता युवक प्रतिष्ठाणातर्फे किशोर बागुल,राकेश शेवाळे,राजेंद्र महाजन,सदा महाजन, दिनेश सूर्यवंशी,सुरेश शेवाळे,भटू देवरे, सोनवणे सर व रवींद्र जाधव यांनी मानपत्र भेट देऊन त्यांचा सत्कार केला.