भामेर । साक्री तालुक्यातील भामेर ग्रामपंचायत पंचवर्षिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. लोकसंख्यावाढीमुळे 1 प्रभाग आणि 2 सदस्य संख्या वाढली आहे. ग्रुप ग्रामपंचायतीत शिवाजीनगर, रायपूर, नवापाडा, जगतपूर, जयश्री सोसायटी, जयभिम सोसायटी या पांड्याचा समावेश आहे. प्रभाग क्र.1 रायपूर घर नंबर 589 ते 701 निवडून द्यावयाचा आहे. उमेदवारी संख्या 3 असून यात दोन जागा स्त्रियासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यात अनुसूचीत जमातीसाठी 1 स्त्री आणि नागरिकांचा मागासप्रवर्ग 1 स्त्री व 1 जागा जनरलसाठी राखीव आहे.
प्रभाग क्र.3 मध्ये 3 उमेदवार निवडून आणार असून 1 उमेदवार अनुसूचीत जमातीसाठी पुरूष तर सर्वसाधारण स्त्री आणि 1 जनरल पुरूष असा आहे. भामेर बेघर वस्ती घर क्र. 69 ते 104 व 205 ते 231, 232 ते 241 जि.प.शाळा प्रभाग रचना करण्यात आली आहे. प्रभाग क्र. 4 नवापाडा घर नं. 702 ते 788 या प्रभागातून 2 उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. यात 1 जागा सर्व साधारण स्त्री 1 जागा नागरिकांचा मागासप्रवर्ग पुरूष अशी आहे. प्रभाग 5 ग्रामपंचायत कार्यालय घर क्र. 367 ते 479 निवडून द्यावयाचे उमेदवार दोन आहेत. यामध्ये 1 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष 1 जागा सर्वसाधारण स्त्री अशी रचना करण्यात आली आहे. असे ग्रामसेवक जे.एस.बोरसे, लिपीक एन.बी.शेख, तलाठी पी.वाय.माळी, मंडळधिकारी चित्ते यांनी सांगितले.
असे आहेत प्रवर्ग
प्रभाग क्र. 2 मध्ये एकूण 3 उमेदवार निवडून द्यायचे आहे. 1 जागा अनु.जातीसाठी राखीव तर 2 स्त्री उमेदवारसाठी राखीव असून अनु.जमातीसाठी 1 स्त्री उमेदवार तर 1 नागरिकांचा मागासप्रवर्ग 1 स्त्री अशी रचना आहे. या प्रभागात जगतपूर जयश्री सोसायटी, जयभिम सोसायटी आणि भामेर जि.प.शाळेपासून घर क्र. 12 ते 68 असा समावेश करण्यात आला आहे.