भामेर येथे पालक-शिक्षक संघाची स्थापना

0

भामेर । निजामपूर-जैंताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती आशुमतीबेन चंपकलाल शाह विद्यालयांमध्ये पालक मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या संस्थेचे अध्यक्ष प्रमोदचंद शाह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. सचिव लक्ष्मीकांत शाह, एम. एम. शिंदे, मुख्याध्यापक मनोज भागवत, आनंद सोनवणे आदी उपस्थित होते. पहिल्या पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पालक शिक्षक संघाचे अध्यक्षपदी मुख्याध्यापक मनोज भागवत, उपाध्यक्ष रावसाहेब सोनवणे, सदस्य जगदिश मराठे, सुरेखा अनिल जाधव यांच्या निवडी करून पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. यशस्वीतेसाठी निलीनी मोरे, प्रसन्ना शाह, आदींनी कामकाज पाहिले. सूत्रसंचालन ललिता सुर्यवंशी यांनी तर आभार जयश्री मोरे यांनी मानले.