भारतरत्न डॉ.कलाम पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

0

नंदुरबार । येथील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. माळीवाडा परिसरात नविनच सुरु झालेल्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनालयात भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे सचिव योगेश माळी यांनी सांगितले की, भारताला क्षेपणास्त्र संपन्न राष्ट्र बनविण्यात डॉ. कलामांचे योगदान महत्वपूर्ण आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जिवनावरील कार्याला उजाळा दिला. त्याचे काम भारताला योगदान असल्याने मान्यवरांनी व्यक्त केले. डीआरडीओ तसेच इस्त्रोमधील त्यांचे कार्य अद्वितीय आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष शरद माळी यांनी केले. सुत्रसंचालन संचालक जयेश देवरे तसेच आभार कोषाध्यक्ष मनोज माळी यांनी मानले. यावेळी संचालक संदिप माळी, मनोज बाविस्कर, सागर माळी, चंद्रशेखर माळी, गणेश माळी, मयुर गुरव, मयुर माळी तसेच वाचक अभिषेक माळी, रुपेश माळी, कुणाल माळी, कल्पेश माळी, महेश माळी, हितेश माळी उपस्थित होते.