भारताकडून जपानचा 4-3 असा पराभव

0

इपोह (मलेशिया) । भारताने सुलतान अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत मनदीपसिंगने केलेल्या हॅटट्रिकच्या बळावर जपानचा 4-3 असा पराभव केला. या विजयामुळे भारताच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या आशा अजून जिवंत आहेत मंगळवारी ऑस्ट्रेलियाकडून 3-1 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आज जपानविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघ 3-1 असा पिछाडीवर असताना 4-3 असा विजय मिळविला.

रुपींदरपाल सिंगने आठव्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र जपानने 45 व्या मिनिटापर्यंत तीन गोल करत 3-1 अशी मोठी आघाडी घेतली. अखेर मनदीपसिंगने 45, 51 आणि 58 मिनिटांना गोल करत भारताने विजय नोंदविला.