मुंबई। भारतीय संघाचे क्रिकेटपटू नेहमी कोणकोणत्या गोष्टीने चर्चेत असतात.ज्याप्रमाणे महागाड्या गाड्याबाबत चित्रपट सृष्टीतील अभिनेते व अभिनेत्री,राजकारणी, उदयोगपती हे चर्चेत असतात.त्याप्रमाणे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा दुचाकी गाड्यांचा चाहता त्याच्याजवळ अनेक महागाड्या दुचाकी गाड्या आहे.त्याचप्रमाणे आता अजुन एक नाव चर्चेत येत आहे.ते म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहली.त्याच्याजवळ असलेल्या गाड्याबाबत तो चर्चेत आहे. क्रिकेटपटू विराटची महागड्या कार खरेदी करण्याबरोबरच त्या वापरणे ही मैदानाबाहेरची विशेष आवड असून तो वेळ मिळेल तसे कार खरेदी करण्याचे आणि चालविण्याचे स्वप्न पूर्णही करतो.
ऑडी एस 6 ही गाडी विराटच्या कार कलेक्शनमध्ये असून सिडनी ए 6 या गाडीचे परफॉर्मन्स एडिशन ही गाडी आहे. या गाडीला देण्यात आलेल्या 4 लीटर टीएफएसआय पेट्रोल इंजिनामुळे 5 मायक्रोसेकंदात 100 ताशी 100 किलोमीटर वेगाने ही गाडी धावते. या गाडीला 420 बीएचपी पॉवरचे इंजिन असून या गाडीची किमत 95 लाख ऐवढी आहे.विराटच्या आवडीच्या गाड्यांपैकी ऑडी कंपनीची क्यू 7 ही गाडी एक आहे.ऑडीची ए 8 डब्ल्यू 12 ही गाडी 1.87 कोटी रुपयांना विराटने 2015 मध्ये विकत घेतली आहे. क्रिकेटच्या मैदानात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेट प्रेमींची मने जिंकणारा विराट गाड्यांचा असा मनमुराद आनंद घेताना दिसतो.