भारताचा चीनला चेकमेट

0

नवी दिल्ली । भारताला डिवचू पाहणार्‍या व युध्दसज्जतेच्या वल्गना करणार्‍या चीनला भारताने चांगलेच चेकमेट केले असून भारतीय नौदलाच्या अवकाशातील तिसरा डोळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या रुक्मिणी या उपग्रहाच्या मदतीने भारतीय नौदल चिनी ड्रॅगनवर बारीक लक्ष ठेवून असणार आहे. गेल्या काही दिवसांपासदून सिक्कीममधील परिस्थितीवरून वाढलेल्या तणावानंतर हिंदी महासागरात भारताचे नौदल सतर्क झाले असून कुठलीही कसूरता न ठेवण्याचा इरादा भारताचा असल्याचडे यावरुन स्पष्ट होत आहे. भारतीय नौदल योग्यवेळीच रुक्मिणीचा वापर करण्यासाठी सज्ज झाला असून युद्धनौका, पाणबुड्या, सागरी हवाई पाहणी विमानांच्या हालचाली, याबाबतचे अपडेट्स रुक्मिणीमुळे नौदलाला मिळत आहेत. अरबी समुद्रापासून बंगालच्या खाडीपर्यंत कोण काय हालचाली करते, हेही हा उपग्रह टिपतो आहे, त्यामुळे चीनच्या दुष्ट कारवायांना चोखपणे उत्तर देणेही शक्य होणार आहे.

नौदलाचे जवान तैनात
भारत-चीन यांच्यातील ताज्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदी महासागरात चीनने मोठ्या संख्येने आपले नौदल सेनेचे जवान तैनात केले आहे. तेथे चिनी नौदलाकडून झालेल्या किमान 13 तुकड्यांच्या हालचालींची नोंद भारताने केली असल्याची माहिती मिळते.

रुक्मिणीचे बारीक लक्ष
संपर्क आणि देखरेख, ही दोन्ही कामे चोख करण्याची क्षमता असलेला जीसॅट-7 हा उपग्रह 29 सप्टेंबर 2013 रोजी उपग्रहात सोडण्यात आला होता. 2625 किलो वजनाच्या या उपग्रहाचे नाव रुक्मिणी असे आहे. हिंदी महासागराच्या विस्तीर्ण क्षेत्रात 2000 किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात हा अवकाशातील डोळा लक्ष ठेवून असल्याने नौदलाचे काम सोपे झाले आहे. हे उपग्रह पृथ्वीपासून 36 हजार किलोमीटर उंचावरून बारीक लक्ष ठेवून आहे.