भारताचा डाव ३२९ धावांत आटोपला:कोहलीचे शतक हुकले

0

नॉटिंगहॅम : भारत आणि इंगलंड यांच्यात तिसरी कसोटी सामना सुरु आहे. त्यात भारताचा डाव ३२९ धावांत आटोपला. आज सामन्याचा दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला सातवा धक्का बसला. नवोदित खेळाडू ऋषभ पंत २४ धावा करून माघारी परतला. स्टुअर्ट ब्रॉडने त्याचा त्रिफळा उडवला. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर पाठोपाठ अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा तिघेही झटपट बाद झाले. . त्यामुळे केवळ २२ धावांची भर घालून भारताचा डाव संपुष्टात आला.

त्याआधी पहिल्या दिवसअखेर भारताने ६ बाद ३०७ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताचे पहिले तीन बळी लवकर बाद झाले. पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने इंग्लिश गोलंदाजांची पुरेपूर गोलंदाजांची धुलाई केली. विराटने ९७ तर अजिंक्यने ८१ धावा काढत भारताला मजबूत स्थितीत आणून ठेवले . पण पुढील फलंदाजांनी मात्र निराशा केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले, तर आदिल रशीदने १ गडी बाद केला.