लंडन । निर्णायक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवातही निराशाजनक झाली. सलामीवीर राहित शर्माला अवघ्या 12 धावांवर मॉर्केलने यष्टीरक्षक डी-कॉककरवी झेलबाद केले. त्यानंतर मात्र शिखर धवन याने 78 तर विराट कोहली याने 76 धावा करून भारताचा विजय साकारला. तर युवराजसिंगने 23 धावांची नाबाद खेळी केली. या विजयामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
विजय माल्ल्यासमोर ‘चोर-चोर’ची घोषणा
भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून लंडनला पसार झालेला विजय माल्ल्याने रविवारी पुन्हा एकदा चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत-दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याला उपस्थिती लावली. मात्र, लंडनच्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर येताच भारतीय पाठिराख्यांनी माल्ल्याची चांगलीच हुर्यो उडवली. माल्याने स्टेडियममध्ये प्रवेश करताच भारतीय प्रेक्षकांनी चोर-चोर अशा घोषणा दिल्या.
फलंदाजीला आलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी सावध खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. डी’कॉक आणि अमलाने पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागिदारी रचली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक केले. आर. अश्विनने अमलाला 35 धावांवर असताना बाद केले. तर डी’कॉकला रविंद्र जाडेजाने बाद केला. डी’कॉकने 53 धावा केल्या. यानंतर आलेला डिव्हीलियर्स आणि मिलरही स्वस्तात माघरी परतले. हे दोघेही धावचित झाले. तर ड्यूपलेसीला हार्दिक पंड्याने तंबूत धाडले. 30 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पुरता गडगडला. 157 धावांवर 5 गडी बाद होते. त्यानंतर लगेच दोन धावांत दोन रनआऊट झाले. भारतीय संघात या सामन्यासाठी उमेश यादव या जलदगती गोलंदाजाऐवजी ऑफ स्पीनर आर. आश्विनचा समावेश करण्यात आला आहे तर दक्षिण आफ्रिकेनेही वेन पार्नेलऐवजी अँडिले फेहलुकवायोचा समावेश केला आहे. भारतीय गोलंदाजांनी द.आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. या सामन्यात बुमहार आणि भुवनेश्वरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर आश्विन, जाडेजा, पंड्याने प्रत्येकी एक विकेट मिळवली. अचूक आणि आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर द आफ्रिकेला 44.3 षटकांमध्ये 191 धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 50 षटकही पूर्ण खेळता आली नाहीत. ख्रिस मॉरीस, फेलुक्व्वायो, रबाडा आणि मॉर्ने मॉर्केल यांनी केवळ हजेरी लावण्याचेच काम केले.
आश्विनला दिला यावेळी संधी
श्रीलंकेविरोधात अनपेक्षितपणे पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विराट कोहलीने आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यासाठी उमेश यादवच्या जागी आर.अश्विनला संधी दिली आहे. श्रीलंकेविरोधात सुमार कामगिरी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कसलेल्या फलंदाजांसमोर सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला हा सामना म्हणजे एकप्रकारे उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे.