कँडी । कँडी कसोटी सामन्यात एक डाव आणि 171 धावांनी यजमान श्रीलंकेला व्हाईटवॉश देत भारतीय क्रिकेट संघाने एक दिवसआधीच देशवासीयांना 70 व्या स्वातंत्र्य दिनाची विजयाची भेट दिली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवून भारताने 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा ऐतिहासीक विजय मिळवला आहे. सुरूवातीला फलंदाज आणि नंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने तिसर्याच दिवशी सामन्याचा निकाल लावला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या भारतीय संघाने शिखर धवन (119) आणि हार्दिक पंड्याचे (108) शतक आणि लोकेश राहुलच्या (85) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 487 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडताना त्यांना पहिल्या डावात 135 धावांमध्ये गुंडाळले. पहिल्या डावात कुलदीप यादवने चार, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन आणि आपल्या शतकी खेळीदरम्यान अनेक विक्रम रचणार्या हार्दिक पंड्याने एक विकेट मिळवली. फॉलोऑन दिल्यावर भारतीय गोलंदाजांनी पुन्हा दुसर्या डावात वर्चस्व गाजवले. दुसर्या डावातही यजमान संघाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर जम बसवायची संधी मिळू न देता 181 धावांवर त्यांचा डाव संपवला. दुसर्या डावात रवीचंद्रन अश्विनने चार, मोहम्मद शमीने तीन, उमेश यादवने दोन आणि कुलदीप यादवने एक विकेट मिळवली.
10 वर्षांची परंपरा कायम
मागील 10 वर्षांच्या कालावधीत भारताने श्रीलंकेविरुद्ध कुठलीच मालिका गमावलेली नाही. उभय देशांमध्ये आतापर्यंत एकुण 15 कसोटी मालिका खेळवण्यात आल्या आहेत. त्यात भारताचा हा आठवा मालिका विजय आहे. श्रीलंकेला आतापर्यंत केवळ तीन मालिका जिंकता आल्या आहेत. इतर चार मालिका अनिर्णित राहिल्या. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकांमध्ये श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. याआधी 1994 मध्ये मायदेशात खेळताना भारताने लंकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. भारताची श्रीलंकेतील ही आठवी कसोटी मालिका होती आणि पहिल्यांदाच भारताने 3-0 असा मोठा विजय मिळवला.
बांगलादेश, झिम्बाब्वेला हरवले
भारताला परदेशात आतापर्यत केवळ बांगलादेश आणि झिम्बाब्वेलाच क्लिनस्विप देता आला आहे. पण या दोन्ही मालिका तीन कसोटी सामन्यांच्या नव्हत्या. भारताने बांगलादेशाला 2000 मध्ये एक कसोटी सामना, 2004 आणि 2010 मध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिका जिंकल्या होत्या. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध त्यांच्याच मैदानावर दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली होती.
शिखर ठरला मॅन ऑफ द सीरिज
या मालिकेत सर्वाधिक धावा करणार्या शिखर धवनला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. धवनने पहिल्या सामन्यात 190 धावा केल्या. धवनची ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती. सामन्यातील दुसर्या डावात त्याने 14 धावा केल्या. त्यानंतर त्याने दुसर्या सामन्यात 35 आणि तिसर्या सामन्यात 119 धावांची शतकी खेळी केली.
धवनचे विक्रम
1 श्रीलंकेतले धवनचे हे तिसरे शतक आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि चेतेश्वर पुजाराने इथे पाच शतके केली ठोकली आहेत.
2 श्रीलंकेत एकाच मालिकेत दोन शतके ठोकणारा तो क्रिकेटमधील सहावा सलामीचा फलंदाज आहे.
3 धवनच्याआधी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने अशी कामगिरी केली होती. धवनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यत सहा शतके नोंदवली आहेत. त्यातील पाच शतके परदेशातील आहे. भारतात खेळलेल्या 24 डावांपैकी केवळ एकाच डावात धवनला शतक करता आले.
निवड योग्य ठरली
3 धवनच्याआधी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने अशी कामगिरी केली होती. धवनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यत सहा शतके नोंदवली आहेत. त्यातील पाच शतके परदेशातील आहे. भारतात खेळलेल्या 24 डावांपैकी केवळ एकाच डावात धवनला शतक करता आले.