भारताचा ‘वन बेल्ट वन रोड’

0

नवी दिल्ली । चीनमध्ये सुरू होणार्‍या दोन दिवसीय ’वन बेल्ट वन रोड’ संमेलनावर भारताने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीनमध्ये आयोजित संमेलनात भारत भाग घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणाताही देश अशा योजनेचा स्वीकार नाही करणार, ज्यामध्ये देशाची सुरक्षा आणि अखंडतेची उपेक्षा होईल. या योजनेतून देशाची सुरक्षा आणि अंखडतेचा सन्मान व्हायला हवा. त्यामुळे भारत आता चीनकडून सकारात्मक उत्तराची वाट पाहत आहे. दरम्यान, भारत पहिल्यापासूनच या संमेलनात भाग घेणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती.

संमेलनात सहभाग नाही मिळालेल्या माहितीनुसार भारत आपल्या कोणत्याच प्रतिनिधीला या संमेलनासाठी पाठवणार नाही. त्यामुळे संपर्क अभियानात पोर्ट, रेल्वे आणि रस्ते अशा संपर्क विकसित करणार्‍या चीनच्या योजनांवर भारताने बहिष्कार टाकला आहे. याचे खरे कारण आहे ते, या योजनेचा एक भाग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. यातूनच चीन आणि पाकिस्तान यांच्यातील इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो. ज्याला भारताचा सुरुवातीपासून विरोध होता. कारण पीओके पाकिस्तानचा नाही तर भारताचा भाग आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कळविण्यात आले आहे.