विराटचे अर्ध शतक, ३ गडी तंबूत

0

साउदम्प्टन: आतापर्यंत आपला एकही सामना न हारलेल्या भारताचा सामना आजन अफगाणिस्तान सोबत येथील साउदम्प्टन या ठिकाणी होत असून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

२०१९ च्या वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्तान च्या संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकला नसून आज त्यांच्या समोर सामना जिंकण्याचे मोठे आव्हान आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचे फलंदाज के.एल.राहुल, रोहित शर्मा खेळपट्टीवर आले असता रोहित शर्मा आफताब आलम कडून १ धावावर बाद होऊन, तर के.एल राहुल ३० धावावर झेल बाद होवून तंबूत परतले आहे. भारताचे ३ फलंदाज आउट झाले असून, विजय शंकर २९ धावांवर बाद झाला आहे.

मोहमद नबी कडून झेल बाद होऊन राहुल परतला आहे. खेळपट्टीवर विराट कोहली, विजय शंकर खेळत आहे. राहुल ने ३६ चेंडूंचा सामना करत 30 धावांवर झेलबाद झाला आहे, रोहित नंतर आलेल्या विराट कोहलीने ६०चेंडूंचा सामना करत ६५ धावा केल्या आहेत. त्यात २ चौकारांचा समावेश आहे. धोनी मैदानावर आला असून ३ धावा केल्या आहेत.
अफगाणिस्थान कडून मुजीब उर रेहमान, आफताब आलम, गुलबदिन नायब यांनी गोलंदाजी केली असून, आफताब आलम याने आपल्या एका षटकात निर्धाव दिली आहे.

२९ षटक अखेर भारताने ३ गडी गमावून १३१ धावा केल्या आहेत.