भारताचा 9 विकेट्सनी दणदणीत विजय!

0

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसर्‍या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 118 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करत भारताने केवळ 1विकेट गमावत आपले लक्ष्य गाठले. या सामन्यात रोहित शर्माने 15, धवनने 56 चेंडूरत नाबाद 51 धावा तर कोहलीने 50 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसर्‍या सामन्यात भारताच्या भेदक मार्‍यासमोर आफ्रिकेची दाणादाण उडाली. भारताकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करत 118 धावांवर आफ्रिकेला रोखण्यात यश मिळवले होते.

यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला मर्यादित धावसंख्येवर रोखले. लेग स्पिनर चहलने 22 धावांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी धाडला. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने वीस धावांत तीन विकेट्स घेतल्या. भुवनेश्‍वर कुमार-जसप्रीत बुमराहनड प्रत्येकी एक विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेचा जेपी डुमिनी आणि खाया झोंडोने सर्वाधिक 25 धावा केल्या. फेब्रुवारी 2016 पासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपराजित राहण्याची दक्षिण आफ्रिकेची मालिका भारताने गुरुवारी खंडित केली. एकदिवसीय मालिका सुरु होण्याआधी ए. बी. डिव्हिलियर्सला तिसर्‍या कसोटीत दुखापत झाली होती. त्यामुळे तो पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांना मुकला. तर, आता कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही मालिकेतून माघार घेतली आहे. यामुळे आफ्रिकेच्या अडचणी वाढल्या आहेत.