भारताची मानुषी छिल्लर ठरली विश्‍वसुंदरी

0

सान्या (चीन) : चीनमध्ये पार पडलेल्या मिस वर्ल्ड 2017 या सौंदर्याच्या सर्वोच्च स्पर्धेत मिस इंडिया मानुषी छिल्लरने बाजी मारली. तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय सौंदर्यवतीने हा मानाचा मुकूट पटकावला आहे. विश्‍वसुंदरी स्पर्धेत मिस इंग्लंड स्टेफनी हिल दुसर्‍या तर मिस मेक्सिको अ‍ॅण्ड्रीया मेझा तिसर्‍या स्थानी राहिली.