नवी दिल्ली: कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात सध्या कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दरम्यान आज ईदनिमित्त परंपरा जपत भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला मिठाईचा पुडा देण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने भारताकडून देण्यात येणारी मिठाई स्वीकारण्यास नकार दिला. राजस्थान सीमेवरती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांना मिठाई देण्याचा प्रयत्न केला.
सणा-सुदीला सीमेवरती तैनात असणारे दोन्ही देशातील सैन्याचे अधिकारी परस्परांना मिठाई देऊन शुभेच्छा देतात. सीमेवर सौहार्दाचे वातावरण रहावे. नात्यातील कटुता संपुष्टात यावी हा हेतू त्यामागे असतो. आज ईदच्या निमित्ताने भारताने परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने मिठाई नाकारुन कटुता आणखी वाढवली.