बंगळुरु । येथील दुसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी भारतीय गोलंदाजानी सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलिया संघाला झटपट बाद केले. भारतीय संघ खेळण्यास सुरवात अतिशय दयनिय झाली पाहिजे तशी सुरवात संघाला सलामीवीर देवू शकले नाही.त्यामुळे भारताचे 4 फलंदाज लवकर तंबूत दाखल झाले होते. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही फलंदाजांनी आपला जम बसवित भारतीय संघाला चांगली सुरवात दिली. तिसर्या दिवसाअखेर 72 षटकात 4 बाद 213 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा (78) व अजिक्य रहाणे (40) धावांवर खेळत आहे. भारताकडे 126 धावांची आघाडी आहे.
तिसर्या दिवसाच्या खेळाला ऑस्ट्रेलियाने 6 बाद 237धावांवरून सुरवात केली. या धावांमध्ये ऑस्ट्रेलियानेे 39 धावांची भर घातली, त्यांचा सर्वबाद 276 धावावर संपला.आर. अश्विनने मिशेल स्टार्कला 26 धावांवर झेलबाद केले.
अश्विनला दोन बळी
त्यानंतर रविंद्र जडेजाने मॅथ्यू वेडला 40 धावांवर पायचित तर, नॅथन लायनला शून्यावर पायचित केले. अखेर जडेजाने हेजलवूडला राहुलद्वारे झेलबाद करत ऑस्ट्रेलियांचा डाव संपवला. पहिल्या डावात भारत 87 धावांनी पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे ही कसोटी जिंकण्यासाठी भारताला दुस-या डावात जोमाने फलंदाजी करावी लागेल. रविंद्र जडेजाने 63 धावांत 6 बळी तर अश्विनने 84 धावांत 2 बळी मिळवले.तिसर्या दिवसाच्या सुरूवातीला भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 276 धावांमध्ये संपुष्टात आणला होता.
राहुलच्या 51 धावा महत्वाच्या
यानंतर भारतीय फलंदाज खेळण्यासाठी मैदानावर आले असता. 87 धावांचा लिड घेवून खेळत असलेला भारतीय संघाची सुरुवात खराब राहिली. भारताच्या चार खेळाडूना ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने तीन, तर ओकिफने एक विकेट घेतली. सलामीवीर अभिवन मुकुंद अवघ्या 16 धावांवर हेजलवूडच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. तर लोकेश राहुल 51 धावांवर बाद झाला. त्याला ओकिफीने झेलबाद केले. विराट कोहली केवळ 15 धावांवर हेजलवूडकडून पायचित झाला. रविंद्र जडेजा 2 धावांवर बोल्ड झाला. शंभर धावांमध्ये भारताचे चार फलंदाज तंबूत दाखल झाल्याने संघाचा डाव सावरण्याची भीस्त अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर आली. पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा यशस्वी सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर रहाणेनेही पुजाराला संयमी साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद 93 धावांची भागीदारी केली.