रांची । कांगारूचा संघ 451 धावांवर ऑलआऊट झाले.याला चोख प्रतित्तर देण्यासाठी भारताचे सलामीवीर मुरली विजय व लोकेश राहुल मैदानावर आले.मैदानावर आल्यावर पहिली धाव चोरून काढली तेव्हाच त्यांनी आज कसोटी क्रिकेट न खेळता वन-डे क्रिकेट पहायला मिळणार कसोटी याचे संकेत देवून दिले होते.त्याचप्रमाणे फलंदाजी करतांना सुरूवातीच्या अवघ्या 25 षटकांत 100 धावा काढल्या.या लोकेश राहुलने चमकदार कामगिरी करून आपले अर्धशतक पुर्ण केले. 67 धावांवर असतांना तो झेलबाद झाला. दुसर्या दिवसाखेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजार(2) व मुरली विजय (36) धावांवर खेळत होते.दुसर्या दिवसाच्या पहिल्या दोन सेशनमध्ये रविद्र जडेजा व उमेश यादवने कांगारूच्या फलंदाजाना तंबूत परत पाठविले.
दुसर्या दिवशी कांगारूच्या विकेट्स
दुसर्या दिवशी 101.2 ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाने ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. मॅक्सवेल 104 धावांवर आऊट झाला. जडेजाच्या गोलंदाजीवर रिद्धिमान साहाकडे त्याने झेल दिला. 116 व्या ओव्हरमध्ये कांगारूची सहावी आणि सातवी विकेटही जडेजानेच घेतली. 115.4 ओव्हरमध्ये मॅथ्यू वेडने साहाच्या हातात झेल दिला. त्यानंतर क्रिजवर आलेल्या कमिंसला भोपळाही फोडू न देता जडेजाने बोल्ड केले.कांगारूची आठवी विकेट लंचनंतर पडली. 134.3 ओव्हरमध्ये उमेश यादवच्या गोलंदाजीवर मुरली विजयकडे झेल देत ओकीफे (25) आऊट झाला. त्यानंतरच्या दुसर्याच ओव्हरमध्ये (135.6वी ओव्हर) जडेजाने नाथन लियॉनला आऊट करत ऑस्ट्रेलियाला नववा झटका दिला. मुरली विजयकडे सोपा झेल देत नाथन आऊट झाला.शेवटची विकेट जोश हेजलवुड याची पडली. हेजलवुड शुन्यावरच रन आऊट झाला.दुसर्या दिवशी कांगारूच्या विकेट्स दुसर्या दिवशी 101.2 ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाने ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. मॅक्सवेल 104 धावांवर आऊट झाला. जडेजाच्या गोलंदाजीवर रिद्धिमान साहाकडे त्याने झेल दिला. 116 व्या ओव्हरमध्ये कांगारूची सहावी आणि सातवी विकेटही जडेजानेच घेतली. 115.4 ओव्हरमध्ये मॅथ्यू वेडने साहाच्या हातात झेल दिला. त्यानंतर क्रिजवर आलेल्या कमिंसला भोपळाही फोडू न देता जडेजाने बोल्ड केले.कांगारूची आठवी विकेट लंचनंतर पडली. 134.3 ओव्हरमध्ये उमेश यादवच्या गोलंदाजीवर मुरली विजयकडे झेल देत ओकीफे (25) आऊट झाला. त्यानंतरच्या दुसर्याच ओव्हरमध्ये (135.6वी ओव्हर) जडेजाने नाथन लियॉनला आऊट करत ऑस्ट्रेलियाला नववा झटका दिला. मुरली विजयकडे सोपा झेल देत नाथन आऊट झाला.शेवटची विकेट जोश हेजलवुड याची पडली. हेजलवुड शुन्यावरच रन आऊट झाला.
मॅक्सवेल, स्मिथची भागेदारी
पहिल्या इनिंगमध्ये कांगारूच्या संघाने 4 बाद 299 धावांवरुन ऑस्ट्रेलियाने खेळाला सुरुवात केली होती. आज दुसर्या दिवसाच्या दुसर्या सेशनमध्ये 451 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 5 विकेट घेतल्या.कांगारू संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने शानदार खेळी करत नाबाद 178 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलनेही स्मिथला उत्तम साथ देत 104 धावांची खेळी केली. आज प्रथम ग्लेन मॅक्सवेलच्या रुपात ऑस्ट्रेलियाची पाचवी विकेट पडली. त्यानंतर 116 व्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाने तीन चेंडूत ऑस्ट्रलियाचे दोन फलंदाज तंबूत परतवले.
भारतीय भूमीवर कांगारुची मोठी भागेदारी
कर्णधार स्टिव्हन स्मिथचे 19 वे कसोटी शतक (117*) आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलच्या (82*) खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने येथे तिसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 4 विकेट गमावून 299 धावा काढल्या. स्मिथ आणि मॅक्सवेल यांनी पाचव्या विकेटसाठी अभेद्य 159 धावांची दीडशतकी भागीदारी केली. दोघांनी ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढले. स्मिथने 244 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार मारले, तर मॅक्सवेलने 82 धावांत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. स्मिथ-मॅक्सवेलची पाचव्या विकेटची भागीदारी ही भारतीय भूमीवर ऑस्ट्रेलियाकडून सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. या दोघांनी मायकेल क्लार्क आणि मॅथ्यू वेड यांची मार्च 2013 मध्ये 145 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.
रवींद्र जडेजाने दुसर्या दिवशी चार गडी बाद करुन घेतल्या 5 विकेट
सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये रवींद्र जडेजाने कांगारूच्या 5 फलंदाजांना तंबूत परत पाठविले. पहिल्या दिवशी एक विकेट घेणार्या जडेजाने दुसर्या दिवशी कांगारूच्या 4 फलंदाजांना तंबूत पाठवले. जडेजाने पहिल्या दिवशी डेव्हिड वॉर्नर तर दुसर्या दिवशी मॅकसवेल, मॅथ्यु वेड, पॅट कमिंस आणि ओकीफे यांना आऊट केले. एकाच टेस्ट मॅचमध्ये 5 बळी घेण्याची जडेजाची ही आठवी वेळ आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात जडेजाने तिसर्यांदा अशी कामगिरी केली आहे.
मॅक्सवेलने कसोटी कारकीर्दीतील केले पहिले शतक
या मॅचमध्ये ग्लेन मॅक्सवेलने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. मॅक्सवेल 104 धावा करुन आऊट झाला. आपल्या खेळीदरम्यान मॅक्सवेलने 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. 180 चेंडूत मॅक्सवेलने 100 धावा पूर्ण केल्या. करिअरची चौथी कसोटी खेळताना मॅक्सवेलचे कसोटीमधील हे पहिलेच शतक होते.
चेंडू पँडमध्ये अडकला आणि हस्य
रांची तिसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कांगारूच्या 80 व्या षटकाच्या तिसर्या चेडूच्या वेळी जडेचा चेडू नीट खेळण्याला स्मिथ अपयशी ठरला.चेडू पँडमध्ये अडकला त्यावेळी स्मिथ97 धावांवर खेळत होता. तो पँडमध्ये अडकलेला चेडू पकडण्यासाठी साहाने असे काही शैल्य लढविले की सर्वांना हसू फुटले.1) चेंडू पँडमध्ये अडकला 2)चेंडू असा पकडला 3)अन अपीन केली…