भारताच्या एकतेचे दर्शन साकळीत दिसून येते -डॉ.उल्हास पाटील

0

साकळीत एकता फाऊंडेशनतर्फे ईद मिलन कार्यक्रम

यावल- तालुक्यातील साकळीत नेहमीच धार्मिक एकतेचे दर्शन विविध उपक्रमातून घडते. या माध्यमातूनच गावातील सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. म्हणूनच साकळी गाव सर्व-धर्म एकतेचे प्रतीक बनले असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले. साकळी येथील एकता फाउंडेशनच्या वतीने पवित्र रमजाननिमित्त ईद मिलनाचा कार्यक्रम सोमवार, 18 रोजी सकाळी 10 वाजता साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.पाटील बोलत होते.

एकतेचे दर्शन साकळीत
एकता फाऊंडेशनच्या वतीने सुरूवातीला सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नंतर शिरखुर्माचे वाटप करण्यात आले. प्रसंगी माजी खासदार उल्हास पाटील म्हणाले की, भारताच्या एकतेचे दर्शन साकळीत दिसून येते. भारतात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात आणि हीच भारताची खरी ओळख बनली आहे. त्याचप्रमाणे साकळीतही विविध जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात आणि अश्याच एकतेचे उदाहरण साकळी गाव ठरले आहे.

यांची होती प्रमुख उपस्थिती
यावलचे तहसीलदार कुंदन हिरे, भाजपाचे प्रदेश चिटणीस सुनील बढे, जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर नारायण सोनवणे, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य वसंतराव महाजन, मोरगाव गटाचे जिल्हा परीषद सदस्य प्रल्हाद पाटील, हजरत रशीद बाबा आश्रमाचे संस्थापक जितेंद्र नेवे (छोटू बाबा), चुंचाळे वि.का.सो.चे माजी चेअरमन सुनील नेवे, साकळीचे उपसरपंच वसीम खान, पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन साहेबराव बडगुजर, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, साकळीचे पोलीस उपनिरीक्षक अशोक अहिरे, यावलचे नगरसेवक असलम मामू, मनोहर गजरे, माजी उपसरपंच किरण महाजन, हाजी रफोद्दीन शेठ, जलील पटेल (कोरपावली) यांच्यासह साकळीसह परिसरातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यांनी घेतले परीश्रम
प्रभाकर सोनवणे, वसंतराव महाजन, सुनील बढे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी एकता फाऊंडेशनचे युनूसशेठ शफी मन्सुरी, ग्रामपंचायत सदस्य सै. अशपाक सै.शौकत, पिंटू, शे.अजगर, शे.अल्ताफ, अर्षद सै.शोएब, शे.कय्युम, इरफानभाई यांच्यासह सर्व सहकार्‍यांनी परीश्रम घेतले.