भारताच्या बॅडमिंटन मिक्स्ड टीमने जिंकले गोल्ड मेडल

0

स्पोर्ट्स डेस्क :– 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटन मिक्स्ड टीमने इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. फायनल सामन्यामध्ये भारताने मलेशियाला 3-1 ने पराभूत केले. चौथ्या मॅचमध्ये सायनाने 21-11, 19-21 आणि 21-9 अशा प्रकारे मलेशियन खेळाडूला पराभूत करीत विजयाच्या जोरावर भारताने मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले. आता भारताला मिळालेले हे 10 वे सुवर्ण पदक ठरले आहे.

भारतीय पुरूष टेबल टेनिस टीमने नायजेरियाला 3-0 ने पराभूत केले. भारतीय महिला टीमने रविवारी सिंगापूरला नमवून गोल्ड आपल्या नावे केला होता. आज सेमीफायनलमध्ये पुरुष टीमने सिंगापूरला 3-2 ने धूळ चारत विजय मिळविला आहे. भारताने प्रथमच महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांत राष्ट्रमंडल क्रीडा टेबल टेनिसला सामिल केल्यानंतर सुवर्ण कामगिरी केली. यानंतर टेबल टेनिसमध्ये सिंगल आणि डबल स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे भारतीय टीमकडून आणखी गोल्ड मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.