भारताच्या षटकाराने पाकिस्तान आऊट

0

लंडन । भारताने आज वर्ल्ड हॉकीलीग सेमीफायनल स्पर्धेत पुन्हा एकदा पाकिस्तानाला पराभूत केले.यापुर्वी साखळी सामन्याता भारताने पाकिस्तानला पुन्हा धूळ चारली होती. 5 व्या व 8 व्या क्रमांकासाठी खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6-1 असा धुव्वा उडवला. मलेशियाने भारताचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यामुळे भारताला परत पाकिस्तानशी सामना करावा लागला.

हॉकीत भारताकडून पाकिस्तानचे पानिपत
साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला 7-1 अशी धूळ चारली होती. त्यामुळे अखेरच्या सामन्यातही पाकिस्तानवर मात करुन भारत स्पर्धेचा शेवट गोड करणार का याकडे सर्व भारतीयांच्या नजरा लागलेल्या होत्या.सामन्याच्या सुरवातीपासून दबाव टाकण्यास खेळाडू यशस्वी झाले होते. 8 व्या मिनीटाला रमणदीप सिंहने खाते उघडले. आकाशदीप सिंह, रमणदीप सिंह, एस.व्ही. सुनील यांनी सुरेख चाली रचत पाकिस्तानी आक्रमण अक्षरशः उध्वस्त करुन टाकले. भारताने पाकिस्तानवर लागोपाट हल्ले सुरू ठेवले.27 व्या मिनीटाला आकाशदीप सिंहचा गोल, 28 व्या मिनीटाला रमणदीप सिहचा गोल करून दुसर्‍यासत्रापर्यंत 4-0 आघाडी घेतली होती.36 व्या मिनीटाला रमनप्रीतने केलेल्या गोलमुळे 5-0 आघाडी घेतली. पाकिस्तानच्या अहमद ऐजाजने घेत पाकिस्तानसाठी 41 व्या मिनीटाला पहिला गोल झळकावला.सामना संपायला अवघी काही मिनीटं बाकी असताना मनदीप सिंहने पाकिस्तानचा बचाव भेदत भारताला 6-1 अशी आघाडी मिळवून दिली. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने केलेला खेळ परिपूर्ण होता.