भारतातील नोकर्‍यांनी गाठला उच्चांक

0

मोदींना दिलासा देणारा सर्वेक्षण अहवाल

नवी दिल्ली : भारतातल्या रोजगारांच्या संख्येने मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत उच्चांकी पातळी गाठली आहे. रोजगारनिर्मिती सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले असून, विविध कंपन्या कर्मचारी संख्या वेगाने वाढवत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. निक्की इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीचा निर्देशांक मार्च महिन्यात 50.3 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. निर्देशांक 50च्या पुढे असणे, हा अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचे लक्षण मानले जाते.

निवासासाठी पर्यायी व्यवस्था
मंगळवारी आलेला हा सर्वेक्षण अहवाल राजकीय आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी दिलासा देणारी बाब आहे. कारण काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष रोजगाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या सत्ताकाळात बेरोजगारी वाढल्याचा त्यांचा आरोप आहे. निक्की इंडियाच्या मार्चच्या अहवालानुसार सेवा व उत्पादन या दोन्ही प्रमुख क्षेत्रात नोकर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. मागणी वाढल्यामुळे सध्या जी व्यवस्था आहे त्यावर दबाव येत आहे. त्यामुळे पुरवठादारांनी मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी संख्येमध्ये वेगाने वाढ केली आहे.