मुंबई : टीएलसी या मनोरंजन वाहिनीवर ‘क्वीन्स ऑफ कॉमेडी’ हा भारतातील पहिला महिला कॉमेडी शो 24 सप्टेंबरपासून शनिवार-रविवारी रात्री 10 वाजता सुरु होत आहे. यात देशभरातील प्रतिभावंत महिला कॉमेडीयन्सना त्या पुरुषांच्या तोडीस तोड असल्याचे सिद्ध करण्यास व्यासपीठ मिळेल. बॉलीवूडमधली भोळी पंजाबी मुलगी रिचा चड्ढा, ‘एआयबी’चे प्रमुख रोहन जोशी आणि कानीझ सुर्का यात परीक्षक असतील. ‘स्ट्रगलिंग अॅक्टर विकी मल्होत्रा’ मधील वरुण ठाकूर हा शो प्रस्तुत करेल. ‘डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडिया’चे बिजनेस हेड- फीमेल अँड फॅमिली एंटरटेनमेंट प्रॉडक्टस, झुल्फिया वारीस यांनी या शोमुळे, भारतातील कॉमेडी जगतामध्ये महिलांकडे बघण्याची दृष्टी बदलून जाईल, असा विश्वास व्यक्त केला. रिचा चड्ढा हीने, भारतामध्ये कॉमेडी क्षेत्रात महिलांना व्यासपीठ नसताना ‘टीएलसी’चा पुढाकार ही कमतरता दूर करण्याच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल असल्याचे सांगितले.