नवी दिल्ली । भारताची अंतराळ संस्था इस्त्रोने एकाच वेळी एकाच अग्नीबाणाच्या सहाय्याने 104 उपग्रहांचे प्रक्षेपण करुन जगातील विकसित देशांच्या पंक्तितही प्रथम स्थान पटकावले आहे. त्यामुळे इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून इस्त्रोने देशातील सर्वात मोठ्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी केली आहे. तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथे जीएसएलव्ही मार्क 3 या रॉकेटसाठी या क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी केली. या अग्नीबाणाची उंची 50 मीटर आणि 414 टन इतकी आहे. म्हणजेच 75 आशियाई हत्तींच्या वजनाएवढे या अग्नीबाणाचे वजन आहे.