कर थकविल्याने मोबाईल टॉवर केले सील

0

भुसावळ । येथील नाहाटा महाविद्यालय मागील गायत्री नगरातील मोबाईलचे टॉवर भुसावळ पालीकेच्या वसुली थकबाकीपोटी सील केले आहे.

गायत्री नगरातील विश्वनाथ ईखे यांच्या ईमारतीवर मोबाईल टॉवर लावलेले असुन त्यांनी पालीकेची थकबाकी न भरल्याने शुक्रवार 31 रोजी मुख्याधिकारी बी.टी. बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख अख्तर खान, पी.डी. पवार, चंद्रकांत पाटील, सचिन नारखेडे, विकास महाजन, किरण मंदवाडे, सुनिल रानसिंगे, राजेश पाटील यांच्या पथकाने मोबाईल टावरला सील केले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.