भारतात आयपीएलनंतर अनेक खेळांच्या लीगचा शुभांरभ

0

भोपाळ । आयपीएलच्या शुभारंभाला दहा वर्षा होत आहे.या दहावर्षात अनेक बदल क्रिकेट खेळात झाले. क्रिकेटमध्ये कमाई , संघातील खेळाडूमध्ये बदल,स्पॉट फिक्सिंगचे आरोपही झाले.अनेक दिग्गज अधिकारी निलंबित करण्यात आले.तर संस्थापक ललित मोदी देश सोडून पळाले आहे. याचबरोबर आयपीएलची प्रसिध्दी पाहता अनेक खेळामध्ये सुध्दा लिग स्पर्धा भारतात सुरू झाल्या त्यामुळे इतर खेळातील प्रतिभावंत खेळाडू समोर आले.

स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. या दहा वर्षांत आयपीएलमुळे भारत आणि जगाचे क्रिकेट अनेक प्रकारे बदलले.आयपीएलची सुरुवात क्रिकेटमध्ये पैशांसाठी झाली होती. . मागच्या 9 वर्षांत आयपीएल खेळाच्या सर्व क्षेत्रांत व्यापले आहे. मात्र, यामुळे कमाई अधिक वाढली.यादरम्यान आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 859% तर बीसीसीआयची कमाई 377% वाढली आहे.

6 लीगचा शुभारंभ
आयपीएलमुळे देशात आणखी 6 खेळांत लीगला सुरुवात; क्रीडा उत्पन्नात 10% वाढ झाली. आयपीएल सुरू झाल्यानंतर हॉकी इंडिया लीग, प्रो कबड्डी लीग, इंडियन सुपर लीग, प्रो रेसलिंग लीग, इंडियन बॅडमिंटन लीग, इंडियन प्रीमिअर टेनिस लीगला सुरुवात झाली. यानंतर देशात क्रीडा प्रायोजक उत्पन्नात 10% वाढ होत आहे. आतापर्यंत 20 स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने झाले; 3 नवे स्टेडियम बनले.
पहिल्या आयपीएलपासून ते आतापर्यंत 20 स्टेडियममध्ये सामने खेळले गेले. आयपीएलनंतर देशात तीन नवे स्टेडियम रांची, पुणे, रायपूर बनले. आणखी चार नवे स्टेडियम प्रस्तावित आहेत. हे उत्तरप्रदेश, आंध्र, उत्तराखंड येथे होतील.

आयपीएल नंतर जगात..
ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग (2011 पासून) नॅटवेट टी-20 ब्लास्ट (2014 पासून)
द. आफ्रिका रॅम-स्लॅम लीग (2012पासून) पाकिस्तान सुपर लीग (2016 पासून)
बांगलादेश सुपर लीग (2011-12 पासून) कॅरेबियन सुपर लीग (2013 पासून)
नोट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि पाकिस्तानमध्ये आयपीएलच्या आधीसुद्धा टी-20 लीग आयोजित झाल्या होत्या. मात्र, आयपीएलच्या यशानंतर जवळपास सर्वांनी लीगला नव्या स्वरुपात पुन्हा सादर केले.