भारतात इतक्या लोकांना कोरोनाची लागण; आरोग्य मंत्र्यालयाकडून ताजी आकडेवारी जाहीर

0

नवी दिल्ली: कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातला आहे. भारतातही याचा फैलाव होत आहे. भारत सरकारने कोरोनापासून बचावात्मक सर्व उपाययोजना केल्या आहेत. आरोग्य यंत्रणा सर्व खबरदारी घेत आहेत. दरम्यान भारतातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची आकडेवारी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने जाहीर केली आहे. यात आज १५ मार्चपर्यंत दुपारी १२ वाजेपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे, त्यानुसार आतापर्यंत १०७ लोकांना याची लागण झाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यात भारतासहित विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.