भारतात उद्योजक वाढल्यानंतरच बलशाली राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होऊ शकते!

0

जळगाव। एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेस सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एस.पी.शेखावत, विभागप्रमुख, मेकॅनिकल इंजिनीरिंग, प्रमुख अतिथी व वक्ते डॉ.बी.डी. कर्‍हाड, फायनान्स अ‍ॅण्ड अकाउंट ऑफिसर डॉ. जि. के. पटनाईक, प्रभारी प्राचार्य, एस.एस.बी.टी.अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव, बी.सी. कछवा, एल.एम.सी.मेंबर, डॉ.बी.बी.इदगे, एनसीएल पुणे, डॉ.सी.एस. दोडके, फॉर्मर अससिस्टन्ट डायरेक्टर, मिनिस्ट्री ऑफ एम.एस.एम. इ. भारत सरकार, डायरेक्टर मास्टर स्ट्रोक तसेच कार्यक्रमाचे समन्वयक व बायोटेकनॉलॉजि चे विभाग प्रमुख डॉ.आय.डी. पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली.

कार्यशाळेत विकास कामांना प्रारंभ
याप्रसंगी आय.इ.डी.सी.चे समन्वयक डॉ.आय.डी. पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी आय.इ.डी.सी.चे महत्व व विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. डॉ.जि.के. पटनाईक यांनी स्वागतपर दिलेल्या मनोगतात देशातील उद्योगांची परिस्थिती व त्यात असलेल्या संधीबद्दल चर्चा केली. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.बी.डी. कर्‍हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी सरकारतर्फे राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती दिली तसेच या योजना अमलात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पुढे बोलतांना त्यांनी सध्याच्या परिस्थितीत भारतीय उद्योजकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याची गरज बोलावून दाखवतांनाच उद्योजकामुळेच बलशाली राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होऊ शकते असे प्रतिपादन केले. यावेळी अनेकांची मोठ्या संख्येन उपस्थिती होती.

यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
उद्घाटन सत्रानंतर डॉ.सी.एस. दोडके यांचे उद्योजगता का?, लघुउद्योग कसा सुरु करावा? व डॉ.बी.बी.इदगे, वैज्ञानिक, एन.सी.एल. पुणे यांचे पेटंट प्रोसिजर या विषयावर तीन सत्रात व्यख्यायन होतील तसेच दुसर्‍या दिवशी डॉ.के.सी. पाटील, डायरेक्टर, पेक्टिकेम इंडस्ट्रीज यांचे क्रिएटिव्हिटी अ‍ॅण्ड बिजिनेस, डॉ.बी.बी. इदगे यांचे इंडियन पेटंट ऐन ओव्हरविव आणि विनोद अग्रवाल, डायरेक्टर, एस.के. ऑइल इंडस्ट्रीस यांचे एक्स्पेरिअन्स ऑफ एग्झिस्टिंग इंटरप्रेनिअर या विषयावर व्यख्यायन आयोजित केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रा.जयंत पारपल्लीवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाचे समन्वयक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.