भारतात प्रत्येक गोष्टीचा राजकारणाशी संबध

0

भुसावळ । राजकारण हा रोजच्या दैनंदिनशी निगडीत आहे. 2014 पुर्वीचा भारत व 2014 नंतरचा भारत अशी विभागणी भविष्यात करावी लागणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोदींनी रणनीती आखली, चिंतन केले, नियोजन केले व अंमलबजावणी केली. बहुमताचे सरकार आल्याने बदलांना प्रारंभ झाला असल्याचे मत डॉ.राहूल रनाळकर यांनी व्यक्त केले. स्वा.सै.नामदेवराव चौधरी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे व अखेरचे पुष्प 24 रोजी गुंफतांना बोलत होते.

संघटनेतर्फे करण्यात आला सत्कार
नुतन स्वा.सै.नामदेवराव सार्वजनिक वाचनालयाच्या दश पुर्ती निमित्त 5 व्या व्याख्यान मालेचे अहिल्यादेवी विद्यालयात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अरुण मांडाळकर, तर प्रमुख पाहूणे म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.दिलीप देशमूख मंचावर उपस्थित होते. डॉ.राहूल रनाळकर यांनी आजच्या राजकारणातील नव आव्हाने याविषयावर मार्गदर्शन करतांना मी खान्देशातलाच आहे. वैचारीक उपक्रम व कार्यक्रम भुसावळला अधिक होत नाही याची खंत आहे. नोटा बंदच्या निर्णयानंतर बदल होवू लागला लोकांनी हा निर्णय स्वीकारला आहे. पुढचे सर्व निर्णय या निर्णयावर अवलंबून आहेत. केंद्र सरकराने नोट बंदिचा निर्णय घेतला व विरोधकांना संजिवनी मिळाली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उर्मिला चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी वाचनालयाचे संचालक आर.के. पाटील, शशिकांत चौधरी, इंदू खाचणे, मोती पाटील तसेच रमेश बिडकर, आरजू गडे, वृषाली श्रीगोंदेकर यांनी परिश्रम केले.