भारतात प्रथमच झाल्या गतिमंद मुलांच्या स्पर्धा

0
चिंचवड: रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड आणि स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेत 225 स्पर्धकांचा सहभाग होता. उद्या रविवारी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे  सुरुवात झाली आहे.
या स्पर्धेत  देशाच्या विविध ठिकाणांहून कानाकोपर्‍यातून स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, यावेळी सचिव बाळकृष्ण खंडागळे, खजिनदार किशोर गुजर, प्रोजेक्ट हेड शंतनू साळवेकर, क्रीडा डायरेक्टर गणेश कुदळे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मयूर कलशेट्टी, प्रसाद गणपुले, दीपेन समर्थ, अभिजित तांबे आदी उपस्थित होते.