भारतात प्रथमच साईश्री हॉस्पिटलमध्ये गुडघ्यावर अनसिमेंटेड बायलॅटरल शस्त्रक्रिया यशस्वी

1

सुशील कुलकर्णी, पुणे :पुण्यातील साईश्री हॉस्पिटलमध्ये अनसिमेंटेड बायलॅटरल या पद्धतीने पूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. भारतात प्रथमच एकाच वेळी दोन्ही गुडघ्यावर या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यात आली.कोथरूड येथील ५८ वर्षाच्या सौ.अनघा जोशी या गेल्या ५ वर्षापासून गुडघा दुखीने त्रस्त होत्या. अनेक ठिकाणी उपचार करून देखील त्यांचे दुखणे कमी झाले नाही. शेवटी त्यांनी साईश्री हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याचे ठरवले. अनघा यांची वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरांच्या असे लक्षात आले की अनघा यांच्या हाडांची स्थिती उत्तम असून अनसिमेंटेड पद्धतीने पूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. या उलट वृद्ध व कमकुवत हाडांच्या व्यक्तीवर या पद्धतीची शस्त्रक्रिया करणे अशक्य  आहे.तथापि, अनघा जोशी या प्रकरणात अपवाद होत्या.

अनसिमेंटेड टी.के.आर ही गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया असून यामध्ये सिमेंट चा वापर न करता बायोलॉजिकल फिक्ससेशन चा वापर करून शस्त्रक्रिया केली जाते. या फिक्ससेशन मध्ये हाडाची वाढ ही इमप्लान्टच्या पृष्ठभागावर असलेल्या सूक्ष्म छिद्रांच्या माध्यमातून होत असून या मध्ये नैसर्गिकरित्या वाढीस मदत होते.अनसिमेंटेड टी.के.आर ही शस्त्रक्रिया तरुण व हाडाची स्थिती उत्तम असलेल्या रुग्णांवर करणे शक्य आहे. ही शस्त्रक्रिया करताना रुग्णास कमी त्रास होतो व शस्त्रक्रिये नंतर गुडघ्यांच्या हालचाली मध्ये वाढ होत असून याचा फायदा रुग्णास दीर्घकाळ होतो.

साईश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. नीरज आडकर म्हणाले की, “ही शस्त्रक्रिया रुग्णांसाठी आतिशय फायदेशीर आहे या मध्ये नैसर्गिकरित्या हाडाची वाढ होण्यास मदत होते. आणि आम्हाला आनंद आहे की भारतात पहिल्यांदा या प्रकारची शस्त्रक्रिया साईश्री हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या करण्यात आली.”सौ.अनघा जोशी म्हणाल्या की “ अगोदर मला खूप जास्त गुडघेदुखीचा त्रास होत होता. रोजच्या दैनदिन कामे करणे देखील अवघड जात असे. पायऱ्या चढण्या व उतरण्यासाठी मला काठीचा आधार घ्यावा लागत होता. मात्र शस्त्रक्रियेनंतर दोन्ही गुडघे दुखणे पूर्णपणे बंद झाले आहे. आणि आता मी दररोज ची कामे सुद्धा कोणत्याही आधार शिवाय करू शकत आहे.