शेंदुर्णी । भारतात विविध पंथाची लोक राहतात. पंथाच्या आचरणानुसार अध्यात्मिक साधना करतात. प्रत्येक पंथ व्यसनांपासून दूर राहन्याचे शिकवण देतात, कौटूंबिक आनंद व आर्थिक गतीसाठी पैसा आवश्यक आहे. पण शरीर व मनाच्या शांतीसाठी आध्यात्मिक अनुष्ठान गरजेचे असल्याने ते अश्या धर्म सभेतून प्राप्त होते म्हणून अश्या प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्याचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे भारतात विविध पंथ असूनही धार्मिक एकात्मता जोपासली जाते. अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परीषदेचे सामाजिक, आध्यात्मिक कार्य स्पृहणीय आहे. आपण सुरू केलेल्या कार्यास शुभेच्छा देतो. शासकीय मदतीतून मंदीरांचे कामे सुरु असून ते वर्षभरात पूर्ण होतील, असे आश्वासन जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिलीे.
दत्तात्रय प्रभूच्या भजनांनी भक्तीमय वातावरण
श्री क्षेत्र शेंदुर्णी (त्रिविक्रम) पुण्यपावन नगरीमध्ये महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी निरोपीत दृष्टांत स्थळ प्रवचन सोहळयाला 8 रोजी प्रारंभ झाला. सकाळी स्मरण पारायण, उटी, विडा अवसर व आरती सकाळी झाली. त्यानंतर भव्यशोभा यात्रा निघाली. यात बॅण्ड पथक, 2 भजनी मंडळ सजविलेल्या घोडा गाडीवर (बग्गी)त दृष्टांतस्थळ प्रवाचक प.पू.प.म.आचार्य लोणारकर बाबा महानुभाव, प.पू.प.म. येळमकर बाबा होते. गोपाला मेगा सिटी दृष्टांत प्रवचन स्थळी खा. रक्षा खडसे, आ. हरीभाऊ जावळे, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, जि.प. अध्यक्षा शितल सांगळे (नाशिक), शेंदुर्णी सरपंच विजया खलसे, उपसरपंच नारायण गुजर आदी मान्यवरांनी श्री प्रभुच्या मुर्तीचे पुजन केले.
यांची होती उपस्थिती
जि.प.माजी सदस्य संजय गरुड यांनी ध्वजारोहण केले. आचार्य कै.प.पू. प. म. शेवलीकर मोठेबाबा कल्लूरकर सभागृहाचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर धर्मसभा झाली. यावेळी ह.भ.प. शांताराम महाराज भगत, प्रकाश नन्नवरे, पं.स. सदस्य डॉ.किरण सुर्यवंशी, सागरमल जैन, शांताराम गुजर, पंडीतराव जोहरे, सुधाकर बारी, अमृत खलसे, डॉ.विजयानंद कुळकर्णी, नामदेवराव बारी, शांतीलाल जैन आदी उपस्थित होती.