भारताने केली श्रीलंकेला पळता भुई थोडी

0

कोलंबो । कोलंबो कसोटीच्या तिसर्‍या दिवशी श्रीलंकेवर फॉलोऑनचे संकट ओढावले असून शुक्रवारच्या 2 बाद 50 धावसंख्येवरून पुढे खेळताना शनिवारी लंकेला आपल्या हक्काच्या मैदानावरुन 186 धावात माघारी परतावे लागले आणि तिसर्‍या दिवसअखेर भारताकडे 230 धावांची आघाडी घेतली आहे.

रविचंद्रन अश्‍विनने दुसर्‍या दिवशी 2 फलंदाजांना माघारी धाडले होते.श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंका संघाची पळता भुई थोडी केली. भारताकडून रवीचंद्रन अश्‍विनने 16.4 षटकांत 69 धावांच्या बदल्यात 5 बळी टिपले आहेत. दरम्यान, भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिले असून लंकेपुढे डावाने पराभव टाळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
भारताचा संघर्ष
करुणारत्ने-मेंडीसची जोडी फोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागत आहे. तत्पूर्वी श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 183 धावात आटोपला. डीकवेलाचा (51) अपवाद वगळता श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर सपशेल नांगी टाकली. मॅथ्यूज आणि डिकवेलामध्ये पाचव्या विकेटसाठी झालेली 53 धावांची पार्टनरशिप श्रीलंकेच्या डावातील एकमेव मोठी भागादारी ठरली. अश्विन आणि जाडेजाने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवत श्रीलंकन फलंदाजीचा कंबरडे मोडले.

जडेजाचा विक्रम
श्रीलंकेच्या पहिल्या डावात जाडेजाने सर्वप्रथम रविंद्र जाडेजाने लंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलचा अडथळा दूर केला. यानंतर मैदानावर आलेल्या धनंजय डिसील्वाचा त्रिफळा उडवत जाडेजाने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सच्या नावे हा विक्रम होता. जॉन्सनने 34 कसोटींमध्ये 150 विकेट घेतल्या होत्या. मात्र जाडेजाने आपल्या 32 व्या कसोटीतच हा विक्रम साधला आहे.

सर्वाधिक बळी
शुक्रवारच्या 2 बाद 50 धावांवरून श्रीलंका संघाने शनिवारी फलंदाजीला सुरुवात केली मात्र पडझड थांबवण्यात लंकेच्या एकाही फलंदाजाला यश आले नाही. लंकेच्या डावात केवळ निरोशन डिकवेला हा मधल्या फळीतील फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला. बाकी एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही. भारताकडून सर्वाधिक 5 बळी अश्‍विनने टिपले तर मोहम्मद शमी आणि जाडेजाने प्रत्येकी दोन व उमेश यादवने एक बळी घेतला. अवघ्या 49.4 षटकांत श्रीलंकेचा संपूर्ण संघ माघारी परतला. भारताला 439 धावांची भक्कम आघाडी मिळाल्याने भारताने लंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आहे.

अश्‍विनने हरभजनला टाकले मागे
अश्‍विनने 26 वेळा एका डावात 5 गडी गारद करण्याची किमया केली असून त्याने याबाबतीत हरभजन सिंगला मागे टाकले आहे. भारताकडून एका डावात सर्वाधिक वेळा 5 गडी बाद करण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 35 वेळा डावात 5 बळी टिपले आहेत.