बर्मिंगहॅम । आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मधील खेळासाठी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एकीकडे एजबेस्टनच्या मैदानात पावसाची रिमझिम सुरू असतानाच भारतीय फलंदाजांनीही धावांची जोरदार बरसात केली. रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग आणि विराट कोहली यांनी फटकावलेली शानदार अर्धशतके आणि शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याने केलेल्या षटकारांच्या आतषबाजीच्या जोरावर भारताने 3 बाद 319 धावा काढल्या होत्या. डकवर्थ लुईथच्या नियमानुसार पाकसामोर आणखी चार धावांची वाढ झाली असून त्यांच्या समोर आता 324 धावा काढून सामना जिंकता येणार आहे.
पाकच्या मोहम्मद अमिर याने सामन्याच्या पहिल्याच षटकात कोणतेही धावा दिल्या नाही. आठ ओव्हरमध्ये 32 धावा, इमाद वसीमने 9.1 ओव्हरमध्ये 66 धावा, हसन अलीने दहा ओव्हरीत 70 धावा तसेच वहाब रियाझ यांनी 8.4 षटकात 87 तर साएब खान यांनी 10 षटकात फक्त 52 धावा दिले होते. पाकने टाकलेल्या 48 व्या षटकात भारताने सलग तीन षटकार मारले तर शेवटच्या चेंडून चौकार मारून 319 धावांचे लक्ष दिले. पाकचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदाना उतरल्यानंतर शेवटचे वृत्तहाती आले त्यांच्यासमोर 41 षटकात 289 धावांचे आव्हान देण्यात आले.
हार्दिक पंड्याचे सलग तीन षटकार
48 षटकात भारताच्या तीन बाद 319 धावा, शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याचे सलग तीन षटकार मारले आहे. यात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 136 धावांच्या भागीदारीनंतर जोरदार फटकेबाजी करणारा शिखर धवन 65 चेंडूत 68 धावा काढून माघारी परतला. शादाब खानने धवनला अझर अलीकडे झेल देण्यास भाग पाडले. शिखर धवनने बाद होण्यापूर्वी रोहित शर्मासोबत दमदार 136 धावांची शतकी सलामी दिली. धवन बाद झाल्यावर रोहित आणि विराटची मैदानावर जमली. दरम्यान, पुन्हा पावसाचा व्यत्यय आला. पाऊस थांबल्यावर दोन षटके कमी करून सामना 48 षटकांचा करण्यात आला. रोहित शर्माने 91 धावांवर रन आऊट झाला. यामुळे रोहितचे शतक होता होता हुकले. भारत-पाक दरम्यान होणार्या या सामन्यात मध्यंतरी अनेक वेळा पावसाने व्यत्ययामुळे वारंवार सामना थांबत होता. यानंतर युवराज सिंगने आपले अर्धशतक पुर्ण करून 53 धावांवर एलबीडब्ल्यू झाला. विराट कोहली (81) आणि हार्दीक पांड्या (20) नाबाद राहिले. आज विराट कोहलीपेक्षाही युवराज अधिक आक्रमकपणे खेळत होता. या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण करत संघाला तीनशे धावांच्या उंबरठ्यावर पोहोचवले. अखेर शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याने तीन षटकार ठोकत भारताला 319 धावांपर्यंत मजल मारून दिली.
भारत-पाक सामन्यात सुरक्षा व्यवस्थेतही होती वाढ
लंडनमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यात होणार्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. ज्या ठिकाणी हा सामना झाला त्याठिकाणच्या जागेपासून 208 किलीमीटर्सवर हल्ल्याची जागा आहे. त्यामुळे भारत-पाकचा सामना नियोजित वेळेनुसारच सुरू झाला होता. दोन्ही देशांचे क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय आणि पीसीबी यांना या हल्ल्याने घाबरून न जाण्याचा सल्ला ब्रिटनच्या इंटेलिजन्सने दिला आहे. अवघ्या दोन आठवड्यांच्या आत लंडनमध्ये झालेला हा दुसरा हल्ला होता. इंटेलिजन्सकडून हल्ल्यासंदर्भातली आणि त्यानंतरच्या दक्षतेची माहिती मिळाल्यानंतर आयसीसीने एक निवेदन जारी केले. पाकिस्तानी संघाच्या व्यवस्थापनाच्या काही सदस्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.