भारताने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक बंद केले तर…

0

नवी दिल्ली । राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका जास्तच संरक्षणवादी झाला आहे. पण फेसबुक आणि गूगल या अमेरिकन कंपन्या असल्यामुळे भारताने या कंपन्यांनाही नाकारावे का? असा सवाल टेलिकॉम क्षेत्रातील अग्रणी भारती सुनील मित्तल यांनी विचारला आहे. मित्तल म्हणाले की, फेसबुक आणि गुगल या दोन्ही कंपन्याचा व्यवसाय भारतावर अवलंबून आहे याचा अर्थ अमेरिकेच्या संरक्शणाची त्यांना चिंता नाही का? पण अमेरिकन कंपन्या भारतात नफा कमवत असतील, तर भारतीय कर्मचार्‍यांना अमेरिकेत येण्यापासून रोखणे चुकीचे आहे.

एअरटेल या मित्तल यांच्या मालकीच्या कंपनीला एखाद्या देशात प्रवेश दिला नाही तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्‍न मित्तल यांना विचारण्यात आला होता. या प्रश्‍नाला उत्तर देताना मित्तल यांनी गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचे कोट्यवधी युझर्स भारतीय असल्याचे उदाहरण देत सांगितले की भारतीय कंपन्यांचेही अशा स्वरूपाचे अ‍ॅप्स आहेत. त्यामुळे भारतात प्रवेश करण्यासाठी गूगल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या कंपन्यांना परवानगीशिवाय प्रवेश द्यायला नको का? व्हॉटसअ‍ॅपचे 15 कोटी, फेसबुकचे 20 कोटी आणि गूगलचे 10 चे कोटी युझर्स भारतात आहे, अशी सेवा देणारे भारतीय अ‍ॅप्सदेखील आहेत. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि गूगल सारख्या कंपन्यांना भारतात काम करण्यासाठी मज्जाव करावा.

भारतीय कंपन्या अडचणीत
ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भारतीय कंपन्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. मागील काही आठवड्यांपासून अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी व्हिसासंदर्भात नियम कडक केले आहेत. या देशांच्या व्हिसावर ग्राहकांना सेवा देण्यासाठी कर्मचारी पाठवणार्‍या भारतीय कंपन्यांची अडचणी वाढू शकतात.