नवी दिल्ली :आशियाई स्पर्धेत भारताला कुस्तीत सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचणाऱ्या वीनेश फोगाट हिने आपला २४ वा वाढदिवस संस्मरणीय केला आहे. सुवर्णपदकाचा आनंद तर होताच, पण जकार्ताहून परतल्यानंतर एअरपोर्टवरच साखरपुडा करून तिने हा आनंद दि्वगुणित केला आहे. आपलं संपूर्ण लक्ष सध्या रेसलिंगवरच आहे. कुस्ती व माझ्यात कोणीच येणार नाही, असं ती म्हणाली. विनेश वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि टोकियो ऑलिम्पिकची तयारी करत आहे.
आशियाई स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी विनेश भारताची पहिलीच महिला कुस्तीगीर ठरली आहे. शनिवारी ती आशियाई स्पर्धेवरून परतली. दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टवरच तिने आपला बॉयफ्रेंड सोमवीर राठी सोबत साखरपुडा केला. शनिवारी तिच्या २४ वा वाढदिवसही होता.
‘गेली ४-५ वर्षे वाढदिवसाच्याच दिवशी मला लग्न कराचयं होतं. आम्ही दोघं गेली ७-८ वर्षं एकमेकांना ओळखतो. पण गेली काही वर्षे वाढदिवसाच्या आसपास मी कुठलं पदक जिंकले नव्हतं, म्हणून साखरपुडा पुढे ढकलावा लागला होता.
जकार्ताहून परतल्यानंतर एअरपोर्टवर गोल्डन गर्ल विनेशचं स्वागत करण्यासाठी तिचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. याच वेळी सोमवीर आणि विनेशने एकमेकांना अंगठी घातली आणि साखरपुड्याचा केकही कापला. विनेशचा होणारा नवरा सोमवीर ग्रीको रोमा कॅटेगरीत रेसलिंग करतो. सोमवीरला नॅशनल मेडल मिळाले आहे. तो सध्या रेल्वेत नोकरी करतो. त्याची पोस्टींग सध्या राजस्थानात आहे.