भारताला गोंजारले, पाकिस्तानला लाथाडले!

0

वॉशिंग्टन | अमेरिकी प्रतिनिधीगृहाने 40,000 अरब रुपयांचे नवे सरंक्षण धोरण शनिवारी बहुमताने मंजूर केले. अमेरिकेने पाकिस्तानला लाथाडताना भारताला मात्र गोंजारले आहे. भारतासोबत प्रगत सरंक्षण सहयोगाचा प्रस्ताव नव्या धोरणात समाविष्ट आहे. मूळ भारतीय सदस्य एमी बेरा यांनी या सुधारणेचा प्रस्ताव मांडला होता.

अमेरिकी सरंक्षण धोरणाला नॅशनल डिफेन्स ऑथराइजेशन अॅक्ट (एनडीएए) म्हटले जाते. 2018 साठी त्यात केलेल्या सुधारणा 81 विरुद्ध 344 मंतांनी मंजूर केल्या गेल्या. ‘एनडीएए 2018’ नुसार, 1 ऑक्टोबर 2017 पासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षात सरंक्षणावरील वार्षिक खर्चाची रक्कम ठरविली जाईल.

सहा महिन्यांच्या आत धोरण
‘एनडीएए’च्या मंजुरीनंतर अमेरिकी परराष्ट्रमंत्री व सरंक्षणमंत्र्यांना अमेरिका व भारतादरम्यान सरंक्षण सहयोग वाढविण्यासाठी सहा महिन्यांच्या आत धोरण आखावे लागेल. राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप यांच्या मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी ‘एनडीएए’ला सीनेटची मंजुरी मिळवावी लागेल.

अमेरिका हा जगातील सर्वात जुना तर भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. उभय देशात प्रगत संरक्षण सहयोग अत्यंत आवश्यक आहे. हा सुधारणा प्रस्ताव मजूर केल्याबद्दल मी आभारी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या धोरणाप्रती मी आशादायी आहे. भारताशी हातमिळवणीमुळे 21व्या शतकातील नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यास अमेरिकेलाही बळ लाभेल.
एमी बेरा,
सदस्य, अमेरिकी प्रतिनिधिगृह