बँकॉक । भारताच्या मिडले रिले संघाने दुसर्या आशियाई युवा मैदानी (अॅथलेटिक्स) अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. गुरिंदरवीर सिंग, पलेंदर कुमार, मनीष आणि अक्षय जैन यांचा समावेश असलेल्या या संघाने दमदार कामगिरी केली. भारताच्या रिले संघाने 1 मिनिट 55.62 सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक नावावर केले. चायनीज तैपेई (1:55.71) व हाँग काँग (1:56.11) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अखेरच्या दिवशी भारताने सुवर्णपदकासह प्रत्येकी एक रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.