नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानची तिळपापड झाली आहे. ३७० रद्द झाल्यापासून पाकिस्तानकडून दररोज युद्धाचा धमक्या देण्यात येत आहे. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताशी युद्ध करणे पाकिस्तानला परवडणार नाही याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. भारताशी पाकिस्तान युद्ध जिंकू शकत नाही असे इम्रान खानने म्हटले आहे. पाकिस्तान भारताशी पारंपरिक युद्ध हरू शकतो, पण याचे परिणाम मात्र गंभीर होतील. त्यांनी अणुयुद्धाचीही धमकी इम्रान खानने दिली आहे.
‘जेव्हा दोन अण्वस्त्र संपन्न देश पारंपरिक युद्ध करतात, तेव्हा ते युद्ध अण्वस्त्राने संपण्याची शक्यता असते. जर पाकिस्तान भारताशी पारंपरिक युद्धात हरत असेल तर देशाकडे दोन पर्याय असतील. एकतर शरण येणं किंवा आपल्या स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणं. अशावेळी पाकिस्तान अखेरपर्यंत लढेल आणि जेव्हा कोणी अण्वस्त्र संपन्न देश अखेरपर्यंत लढतो, तेव्हा त्याचे गंभीर परिणाम होतात.’