नवी दिल्ली । चीनी खेळाडूचे बॅडमिंटन खेळात वर्चस्व होते.त्याचा दबदबा होता या खेळात. मात्र गेल्या काळात भारतीय बॅडमिंटनपटूंनी चिनी खेळाडूच्या या वर्चस्वाला जबरजस्त हादरा दिला आहे. त्याच्या खेळाने एक उंची गाठली आहे.त्यामुळे चिनी वर्चस्वाला हादरे बसले आहे. अशी प्रतिक्रिया ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी.व्ही.सिंधूने दिली. इंडिया ओपन सुपर सिरीज स्पर्धेची तयारी, राष्ट्रीय स्पर्धा आणि खेळाडू, भारतीय बॅडमिंटनपटूंचे बदलते स्वरुप या बाबींवर सिंधूने आपले मत व्यक्त केले.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिधूंने म्हटले की, खेळ गेल्या काही वर्षांच कमालीचा उंचावला आहे आणि याचा सर्वाधिक धसका चीनी खेळाडूंनी घेतला आहे. भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी चमकदार खेळ करताना चीनच्या खेळाडूंना पराभूत केले आहे.