नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमधील बँकांत भारतीयांनी ठेवलेले काळे धन तसेच ठेवींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. स्वीस नॅशनल बँकेने (एसएनबी) जारी केलेल्या ताजा आकडेवारीनुसार, या बँकांतील ठेवींत ब्रिटन अव्वल असून, भारताची 88 व्या स्थानावर घसरण झाली आहे. भारतीयांचे केवळ 0.04 टक्के एवढेच धन सद्या या बँकांत असल्याची माहितीही एसएनबीद्वारे देण्यात आलेली आहे. करचोरीकरून स्वीस बँकांत ठेवण्यात आलेल्या ठेवींची माहिती आदान-प्रदान करण्याबाबत भारत व स्वित्झर्लंडमध्ये नुकताच द्वीपक्षीय करार झालेला आहे. त्यानुसार, एसएनबीद्वारे या संदर्भात सविस्तर आकडेवारीच प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यात विविध देशांतील नागरिकांच्या किती ठेवी विविध बँकांत आहेत, याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
2004 मध्ये भारत होता 37 व्या स्थानावर
स्वीस बँकांत ठेवी व करचोरी करून धन जमा करण्यात भारताचे 37 वे स्थान होते. तर 2007 मध्ये 61 वे आणि 2015 मध्ये 75 वे स्थान होते. 2007 पर्यंत पहिल्या 50 देशात भारताचा क्रमांक असल्याने मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. तसेच, काळ्या पैशाचा मुद्दा चर्चेला आला होता. स्वित्झर्लंडमधील बँकांच्या गोपनीयतेबद्दल जागतिक पातळीवर मोठे आंदोलन झाल्यानंतर या देशाने आपले बँकिंग धोरण बदलले होते. त्यानंतर भारतीयांनी तातडीने आपला पैसा अन्यत्र वळविला. स्वीस बँकांच्या तुलनेत आता सिंगापूर, हाँगकाँग या देशात भारतीयांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची बाबही उघडकीस आलेली आहे.
भारतीयांचे 4500 कोटी स्वीस बँकांत
स्वीस बँकांत ठेवी ठेवण्यात सद्या ब्रिटनचा पहिला क्रमांक लागतो. तसेच, भारतासह अनेक देशातील नागरिकांनी स्वीस बँकांतून आपला पैसा काढून घेतला आहे. 2016मध्ये स्वीस बँकांत विदेशी नागरिकांचा 1420 अब्ज स्वीस फ्रँक (सीएचएफ) इतका पैसा होता. त्यात ब्रिटनच्या नागरिकांचे 359 अब्ज स्वीस फ्रँक इतके पैसे आहेत. म्हणजे, 25 टक्के ठेवी या ब्रिटनवासीयांच्या आहेत. भारताच्या या देशासोबतच्या करारामुळे त्या देशातील कोणत्याही बँकेत खाते उघडले तरी त्याची माहिती भारत सरकारला मिळणार आहे. सद्या या देशातील बँकांत भारतीयांच्या केवळ 67.60 कोटी स्वीस फ्रँक (जवळपास 4500 कोटी) इतक्याच ठेवी आहेत. सलग तीन वर्षात मोठ्या प्रमाणात ठेवी काढून घेतल्या असून, सद्या 2015 मध्ये 0.08 टक्के असलेले हे प्रमाण आता केवळ 0.04 टक्क्यांवर आले आहे.वक्तव्यावर सोनिया गांधी यांनी नाव न घेता टीका केली आहे. कारण गेल्या दोन दिवसांत गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून दोन मृत्यू झाले आहेत.
निषेधासह कारवाईही झाली पाहिजे
वाढता हिंसाचार आणि जमावाकडून होणार्या मारहाणीचा निषेध तर झालाच पाहिजेच, शिवाय असे करणार्या समाजकंटकांवर कारवाई केली पाहिजे. ज्यामुळे अशा घटनांवर वचक बसण्यास मदत होईल.
-प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती