भारतीय अभियंत्याच्या हत्या प्रकरणात अमेरिकेच्या नौदलाचा माजी कर्मचारी दोषी

0

वॉशिंग्टन । अमेरिकेतील कंसास येथे भारतीय अभियंत्यांची गोळ्या मारून हत्या करणार्‍या न्यायालयाने वांशिक हिंसाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. अमेरिकेच्या नौदलातील माजी कर्मचारी असलेल्या डम प्यूरिटन याने वंश, रंग, धर्म आणि राष्ट्रीयतेच्या आधारावर भारतीय अभियंता श्रीनिवास कुचिभोटला यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली. तसेच आलोक मदासानी याची हत्या करण्याचा प्रयत्न केला, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

या गुन्ह्यात प्यूरिटन याला आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. न्यायालयाने याबाबत निर्णय राखून ठेवला असून यावर नंतर निर्णय दिला जाईल. प्यूरिटन याने कंसास येथील एका रेस्टॉरंटमध्ये याचवर्षी 22 फेब्रुवारीला अंदाधूंद गोळीबार केला होता. यामध्ये भारतीय अधियंता श्रीनिवासचा मृत्यू झाला होता. आणि इतर दोघेजण जखमी झाले होते. मृत श्रीनिवास हा मुळचा हैदराबादचा होता. अमेरिकेतील एका टेक कंपनीत ते दोघेजण कार्यरत होते. डम प्यूरिटन हा अमेरिकन नौदलात होता. सध्या तो जॉन्सन कौंटी येथील तुरुंगात आहे.