भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये चकमक: तीन भारतीय जवान शहीद

0

लडाख:भारत आणि चीनमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये हिंसक चकमक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. लडाखमधील गालवान खोऱ्यात सोमवारी रात्री ही चकमक झाली. यावेळी चीनने केलेल्या गोळीबारात तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे १९६७ नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये अशा पद्धतीने हिंसक चकमक झाली आहे.

गालवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली. यामध्ये भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. यानंतर दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकारी तणाव वाढू नये यासाठी आपापसांत चर्चा करत आहेत.