भुसावळ। भारतीय ओडबसम या संघटनेतर्फे सर्व जाती धर्मिय नागरिकांना सोबत घेऊन क्रांती घडविण्यासाठी भारतीय ओडबसम क्रांती स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेतर्फे शेतकरी आणि कष्टकरी, कामगारांच्या मुला मुलींना वह्या वाटप आणि आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच चित्रपट अभिनेते, अभिनेत्री यांचा धुमधडाका कार्यक्रम देखील रविवार 18 रोजी रेल्वे कला मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सध्या शाळांना तसेच शेतकर्यांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. मात्र गोरगरीबांकडे यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत असते. त्यादृष्टीने जगन सोनवणे यांच्याकडून ओडबसम संस्थेतर्फे वह्या व शेतकर्यांना आर्थिक मदत केली जाईल. यामध्ये अभिनेत्री मीरा जोशी, कुशल बद्रीके, डायरेक्टर विजू माने, वेशभुषाकार प्रिया वैद्य यांची उपस्थिती राहील. तरी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार नेते जगन सोनवणे, नगरसेविका पुष्पा सोनवणे यांनी केले आहे.