धर्मशाळा । अंतिम कसोटी विराट कोहली दुखापतीमुळे या कसोटीतून बाहेर असल्यामुळे भारतीय संघाची धुरा मुंबईचा अजिक्य राहणे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली.स्वभावाने शांत,संयमी खेळाडू आहे.तो भारतीय कसोटी संघाचा 33 वा कर्णधार बनला आहे.या मालिकेत त्याला सुर गवसलेला नाही आहे.धावांसाठी त्याचा झगडा सुरू असतांना त्याच्यावर कर्णधारांची जबाबदारी देण्यात आली आहे.विराटऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान मिळाले आहे.
रांची दुखापतीमुळे विराट कोहलीला धर्मशाळा येथील कसोटीला मुकावे लागले आहे.त्याच्याजागी कर्णधार पदाची धुरा उप कर्णधार अजिक्य राहणे याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.तो भारताच्या कसोटी संघाचा 33 वा कर्णधार बनला आहे.फक्त बंगळुरुच्या दुस-या कसोटी सामन्याच्या दुस-या डावात त्याने केलेली 52 धावांची अर्धशतकी खेळी निर्णायक ठरली होती. फॉर्मसाठी चाचपडणा-या अजिंक्य राहणेच्या खांद्यावर कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
या कसोटीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला असून या निर्णायक कसोटीत भारताला विजय मिळवून देत अजिंक्य रहाणेला नेतृत्वगूण सिद्ध करण्याची संधी आहे. मुंबईच्या श्रेयस अय्यरला पाचारण करण्यात आले होते. मात्र अय्यरऐवजी कुलदीप यादवला संधी देण्यात आली. भारतीय संघात पाच गोलंदाजांना स्थान दिले आहे. कुलदीप यादव हा डावखूरा फिरकी गोलंदाज आहे.तर दुसरा बदल इशांत शर्माच्या जागी भुवनेश्वर कुमारची निवड करण्यात आली आहे.