इंदूर: भारत आणि बांगलादेश संघात पहिला कसोटी सामना आजपासून इंदूर येथे सुरू आहे. पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांची त्रिधा तिरपीट उडाली. मोहम्मद शमी, आर अश्विन यांच्यासह भारताच्या अन्य गोलंदाजांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर बांगलादेश संघ पूर्णपणे भुईसपाट झाला. बांगलादेशचे सर्व फलंदाज अवघ्या 150 धावांत माघारी परतले. भारताकडून शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
बांगलादेशने प्रथम नाजेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय फेल ठरविला. पहिल्याच सत्रात सलामीवीरांना माघारी पाठवले. 2 बाद 12 अशा अवस्थेत सापडलेल्या बांगलादेशसाठी मोमिनूल हक ( कर्णधार) आणि मुश्फिकर रहीम ही जोडी धावली. तत्पूर्वी, मोहम्मद शमीनं बांगलादेशला तिसरा धक्का दिला. ही जोडी अश्विननं तोडली अन् बांगलादेशची अवस्था 4 बाद 99 अशी केली. अश्विननं मोमिनूल ( 37) याला बाद केलं. ही विकेट त्याच्यासाठी विक्रमी ठरली.