भारतीय चित्रपटांना उच्च स्तरावर नेऊन ठेवणार ‘ब्रम्हास्त्र’

0

मुंबई : बॉलीवूडची चुलबली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

आलियाने मुंबईच्या ‘ईस्ट ग्रीट्स वेस्ट-ए कन्वर्सेशन थ्रू कॅलीग्राफी’ च्या प्रीव्ह्यूमध्ये काही प्रतिनिधींशी संवाद साधला. तेव्हा ती म्हणाली, ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाबद्दल मी खूपच उत्साहित आहे. मला असे वाटते, की ‘ब्रम्हास्त्र’ भारतीय चित्रपटांना पुढच्या स्तरावर घेऊन जाईल. पुढच्या वर्षासाठी मी खूपच उत्साहित आहे.

बॉलीवूडचे शेहेनशा अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि निर्माता करण जोहर चित्रपटाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. ‘ब्रम्हास्त्र’मध्ये आलियाशिवाय रणबीर कपूर, नागार्जुन आणि मौनी रॉय यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे.