शहादा । तालुक्यातील प्रकाशा येथे भाकपा चा जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाकपाचे राज्य सहसेक्रेटरी कॉ. तुकाराम भस्मे यांच्या हस्ते पक्षाचा लाल झेंडाचे ध्वजारोहण करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन कॉ. हिरालाल परदेशी यांनी केले. देशभरातील शहीद जवानांना सामुहीक श्रध्दांजली देण्यात आली. या अधिवेशनात 9 ठराव पारित करण्यात येवुन तीस प्रमुख कार्यकर्त्यांची जिल्हा कमिटीत निवड करण्यात आली. अधिवेशन स्थळाला कॉ. सोनाबाई पवार नाव देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्याचे सचिव कॉ. माणक सूर्यवंशी यांनी तीन वर्षाचा कामाचा अहवाल मांडला. अहवालावर चर्चा करण्यात येवुन तो पारित करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
सूत्रसंचालन कॉ. ईश्वर पाटील यांनी केले. यावेळी द्वारकाबाइ गांगुर्डे , मघुकर पाडवी, कॉ. सतीश वळवी , सरपंच कॉ. मुलकनबाई ठाकरे, अर्जुन कोळी, दिलीप पाडवी, गोपाळ कांबळे , रोहिदास महाराज , बेबीबाई न्हावी , संगीता सूर्यवंशी , दिवाण मोरे , सिताराम माळी, धर्मा पवार, कॉ. शहा , दंगल सोनवणे , बुधा पवार , गुलाब माळी , नजाबाई पवार , देविसिंग वळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते . अधिवेशनासाठी भाकपाचा शहादा तालुका कौंसिल व प्रकाश युनिटचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी कामकाज पाहिले.
डाव्यांनी एकजूट करावी
कॉ. भस्मे म्हणाले की, भाजपाच्या केंद्र व राज्य शासनाने जनतेचा भ्रम निरास केला आहे. शेतकर्यांकडे या सरकारने अजिबात लक्ष दिले नाही. गुजरातमध्ये होवु घातलेल्या निवडणूकांमध्ये भाजपला हद्दपार केल्याशिवाय पर्याय नाही. कॉ. जिवन पाटील यांनी कठीण काळात आपले अधिवेशन होत असून डाव्यांची एकजूट रहावी यासाठी भाकपा व माकपा ने पुढाकार घेतला पाहिजे. कॉ. मोहन शेवाळे यानी जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतरण शासनाने थांबवुन स्थानिक रोजगार उपलब्ध केला पाहिजे. पेसा कायद्याची प्रभावी अमलबजावणी व्हावी यासाठी भाकपा आदिवासी महासभेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकर्यांना निवृत्तीवेतन द्या
प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजसह सुसरी ,दराधरणातील पाणी शेतकर्यांचा शेतापर्यंत न्यावे. वृध्द विधवा, अपंगाचा निवृत्ती वेतनात तीन हजार रुपये वाढ करा. शेतकर्यांना निवृत्ती वेतन द्या. सरसकट कर्ज माफी द्यावी. शहादा शहरातील बसस्थानक परिसरातील 28 व्यावसायिकांचे पुर्नवसन करुन त्यांना मृदा योजनेतुन कर्ज द्या. आशा कर्मचारी, गट प्रवर्तक , ग्रामरोजगार , अंशकालीन परिचर यांना 15 हजार रुपये वेतन द्यावे व शासन सेवेत शैक्षणिक पात्रतेनुसार सामिल करा , महिलासाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा सह आदि ठराव पारित करण्यात आले