पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी विशाल पुरुषोत्तम लायगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
कामगारांचे विविध प्रश्न व तक्रारी सोडविणे, कामगार व मालक यांच्यात सलोख्याचे संबंध अबाधित ठेऊन त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देणे, या पद्धतीच्या कामांसह संघटनेच्या माध्यमातून माथाडी कामगारांसोबतच भारतीय जनता पक्षाचे काम प्रभावीपणे करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश लायगुडे यांना नियुक्तीपत्राद्वारे शिवाजी पाटील यांनी दिले आहेत.