चाळीसगावातील आजी-माजी जवानांचे मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
चाळीसगाव – देश सेवा करत भारतीय सैन्यात सेवा बजावुन निवृत्त झालेल्या व सेवा बजावत असलेल्या सैन्य दलातील आजी. माजी जवानाना चाळीसगाव नगरपरीषदेने बहुमताने ठराव करून नळपट्टी व घरपट्टी माफ करावी, अशी मागणी २४ डिसेंबर रोजी मुख्याधिकारी यांना आजी माजी भारतीय जवानांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यापुर्वीही मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे आजी माजी सैनिकांची घरपट्टी व नळपट्टी माफ करावी, अशा आशयाचे निवेदन दिले होते. मात्र त्यावर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी अद्यापपर्यंत निर्णय घेतला नाही. म्हणून २४ रोजी आजी माजी सैनिकांच्या वतीने मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना सैन्य दलातील जवानांची घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देशसेवा बजावुन सेवानिवृत्त झालेल्या व सेवा बजावत असलेल्या जवानांना पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने नळपट्टी व घरपट्टी माफ करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने सकारात्मक भुमिका घेऊन सैन्य दलातील आजी व माजी जवानांची नळपट्टी व घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेऊन सैनिकांचा सन्मान करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदनावर वाल्मिक गरुड, संभाजी पाटील, विकास पाटील, रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, पुरुषोत्तम सोनवणे, माधवराव देवरे, गुलाब पाटील, रवींद्र महाजन, खाटीक मोबीन, प्रमोद पाटील, योगेश पाटील, गौरव सोनवणे, संदिप चौधरी, सुकलाल पाटील, रावसाहेब पाटील, अशिष शेटे, समाधान पाटील, विलास शेळके, सुरेश निकुंभ, राजेंद्र देसले, सागर पाटील, कैलास अजबे यांच्या सह आजी माजी सैनिकांच्या सह्या आहेत.