भारतीय जवानास जबर मारहाण

0

चाळीसगाव  । तालुक्यातील करगाव येथील रहिवाशी सी.आर.पी.एफ जवान देवेंद्रसिंग पुरणसिंग पवार हा मोबाईल दुरुस्ती साठी शहरातील गणेश कॉम्प्लेक्स मध्ये या जवानाला काही मोबाईल दुकान चालकाने बेदम मारहाण केली. डोक्यात लोखंडी रॉड व लोखंडी खुर्चीने मारहाण केल्याने जवान गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी 16 रोजी घडली. जवानाच्या फिर्यादीवरून अखेर त्या दुकानदारांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान 18 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जखमी फिर्यादी जवान देवेंद्रसिंग पवार यांना घेऊन तपास अधिकारी रसेडे यांचेसह पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, प्रशांत दिवटे व कर्मचारी घटना स्थळावर चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या कडील जमावबंदी कायद्याचे उलंघन केल्या प्रकरणी आरोपी करण, राकेश, मोहित, जितू, दीपक हुसेन व त्यांच्या सोबत असलेले इतर 6 ते 7 अनोळखी विरोधात गुन्हा नोंद आहे. तपास पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे करीत आहेत.